पिंपरी | संतपीठ शाळेतील विद्यार्थिनीची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,टाळगाव चिखली येथील इयत्ता सातवी विभाग संत मीराबाईमधील विद्यार्थिनी रिद्धिका रविकुमार पाटील हिने मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सिलांबम ओपन चॅम्पियनशिप-2024 मध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकले.
25 मे ते 27 मे दरम्यान मलेशियन सिलंबम फेडरेशन आयोजित नऊदेशांच्या खेळाडूंनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. या यशाबद्दल संतपीठ शाळेचे संचालक हभपराजू महाराज ढोरे, संचालिका डॉ.स्वातीमुळे,
प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार,समन्वयिका मयुरी मुळूक यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





