Satara: जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करा संतोष पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत आवाहन
Satara दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांमध्ये एकाच वेळी व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाईल.

Satara: युवा पिढी देशाचे भवितव्य असून, मादक पदार्थांच्या विळख्यातून समाजाला वाचवण्याची सर्वांची जबाबदारी आहे. जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत दि. 18 ऑगस्ट रोजी राष्ट्रव्यापी व्यसनमुक्ती शपथ घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार व इतर अधिकारी उपस्थित होते. ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी राज्यात ‘मादक पदार्थांविरोधात राष्ट्रव्यापी शपथ’ घेण्यात येणार आहे. मादक पदार्थांपासून तरुण पिढीचे रक्षण करणे आणि सातारा जिल्हा व्यसनमुक्त करणे, या मुख्य उद्देशासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन संतोष पाटील यांनी केले.
दि. 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये व वसतिगृहांमध्ये एकाच वेळी व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमामध्ये भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रव्यापी शपथ या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, खाजगी संस्था, शासकीय व़ निमशासकीय कार्यालये आणि नागरिकांनी हीींिीं://पालर.वेीक्षश.र्सेीं.ळप, हीींिीं://परीहर्राीज्ञीं.वेीक्षश.र्सेीं.ळप/परीहरर्-ाीज्ञींळ-ाळीीं, हीींिीं://परीहर्राीज्ञीं.वेीक्षश.र्सेीं.ळप/शश्रिशवसश या क्यूआर कोड व लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.





