“ये टॉम्या तुलापण..” संतोष जुवेकरने टॉम क्रूझबाबत केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई – मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर भाईगिरी आणि आपल्या हटके अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मराठीसह संतोषने हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये देखिल आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. मात्र सध्या संतोष चर्चेत आला आहे ते हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुझमुळे.
तुम्ही म्हणाला टॉम क्रूझ आणि संतोषचा काय संबंध.. दोन्हही स्टार्सचा आपापसात काहीही संबंध नाही. संतोषने आपल्या इंस्टाग्रावर टॉम क्रूझबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी संतोषने टॉमचा एक भन्नाट फोटो देखील शेअर केला आहे. यासोबत मराठी अभिनेत्याने लिहिलेला मजकूर चांगलाच लक्षवेधी ठरतोय.
टॉमचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये टॉमचे आणखी दोन अवतार त्याच्याच शेजारी उभे असल्याचे दिसतात. खरं तर तीन तीन टॉमला पाहून कोणीही चक्रावून जाईल म्हणूनच एकाच फ्रेममधील अभिनेत्याचे तीन फोटो पाहून संतोषला देखील भन्नाट आयडिया सुचली आणि त्याने ती सोशल मीडियावर व्यक्त केल्याचे दिसते.
संतोषने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो म्हणतो,”जर हा फोटो खरा असेल तर असा सेम कुणी माझ्यासारखाच दिसणारा असेल तर मला फोटो पाठवा ! एकाच वेळेला खूप कामं आली तर वाटून घेता येतील.. खरच पाठवा.. आणि मला टॅग करा.. एकमेका सहाय्य करू अवघे मिळवू यश ! टॉम क्रूझला टॅग करून संतोष म्हणतो,ये टॉम्या तुलापण टॅग केलंय तूपण पाठवू शकतोस बरका तुझा फोटो तुझ्या आधार कार्डवरच्या फोटो सारखाच दिसतो मी डोंट वरी वी आर सेम टू सेम'”
View this post on Instagram
संतोषच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील मजेशीर कमेंट केल्या आहेत. आधार वरचा फोटो आणि माणूस यात फरक असतो अशी कमेंट एकाने केली आहे. तर आणखी एकाने ठीक आहे असाच एखादा भेटला तर नक्की पाठवतो असं म्हणतात आहे.





