Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वच महाराष्ट्र हळहळला होता. राज्यभरातून या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंचपद हे रिक्त झाले होते. तिथे आता पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीत सरपंच पदासाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आज 9 एप्रिल 2026 रोजी आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांनी एकमताने आणि ग्रामस्थांशी विचार विनिमय, चर्चा करुन अश्विनी देशमुख यांचे नाव निश्चित केलं आहे. Santosh Deshmukh Santosh Deshmukh Case त्यानुसार, आज सकाळी 11.00 वाजता सरपंच पदासाठी त्या आपला उमेदवारी अर्ज साध्या पद्धतीने दाखल करणार आहेत. येथील नवीन सरपंचांचा कालावधी 18 महिने असणार आहे. बिनविरोध सरपंच पद द्या… मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा अर्ज भरुन त्यांना बिनविरोध सरपंच पद द्यावे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरपंच पद देणे हीच खरी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे, अशी अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. असा आहे निवडणूक कार्यक्रम या निवडणुकांसाठी 07 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली असून 13 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल आणि 17 एप्रिल रोजी निवडणूक लढवण्याची इच्छा नसलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर 28 एप्रिल रोजी मतदान होईल आणि 29 एप्रिल रोजी निकाल लागणार आहे. Santosh Deshmukh एक आरोपी अद्यापही फरार दरम्यान, बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची9 डिसेंबर 2024 रोजी क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. धनंजय मुंडे यांना या प्रकरणात राजीनामा ही द्यावा लागला होता. मुंडे यांचे जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्या याप्रकरणातील आरोप सध्या तुरुंगात आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असल्याने अनेकांकडून रोष व्यक्त केला जातो. हेही वाचा: Sharad Pawar : संधी द्या, महिला सोनं करून दाखवतील! शरद पवारांकडून स्त्री शक्तीचे कौतुक