Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी 14 महिन्यानंतर येणार जेलबाहेर; कारण काय?
Santosh Deshmukh Case: आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली.

Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडवर देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा खंडणीचे आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
मात्र या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी जेलबाहेर येणार आहे. त्याचे कारण म्हणजे, जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे 2 मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले. निधनानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यान, हिंदू धर्मपरंपरेनुसार निधनानंतर बाराव्या दिवशी होणाऱ्या धार्मिक विधीला उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती.
saudi arabia on iran: “बस्स झालं आता हल्ला कराल तर….” ; सौदीचा इराणला थेट इशारा
या अर्जावर 6 मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली.
तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन त्याला करावे लागणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागेल.
हेही वाचा:





