Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळा 2026 चे वेळापत्रक श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदा श्रींच्या पालखीचे प्रस्थान 8 जुलै रोजी होणार आहे. 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता श्रींच्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान होऊन पहिला मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारत, आळंदी येथे होणार आहे. 9 जुलै रोजी पालखी पुण्याकडे प्रस्थान करणार असून 9 व 10 जुलै रोजी पुणे येथे मुक्काम असेल. यानंतर 11 जुलै रोजी पालखी पुण्याहून सासवडकडे रवाना होईल. 11 व 12 जुलै सासवड, 13 जुलै जेजुरी, 14 जुलै वाल्हे, 15 जुलै नीरा स्नान व लोणंद मुक्काम, 16 जुलै तरडगाव, 17 जुलै फलटण, 18 जुलै बरड, 19 जुलै नातेपुते, 20 जुलै माळशिरस, 21 जुलै वेळापूर, 22 जुलै भंडीशेगाव, 23 जुलै वाखरी आणि 24 जुलै रोजी पालखी पंढरपूर येथे दाखल होणार आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा पंढरपूर येथे पार पडणार आहे. परतीच्या प्रवासात 29 जुलै रोजी चंद्रभागा स्नान, गोपाळपूर काला व विठ्ठल-रुक्मिणी भेटीनंतर पालखी आळंदीकडे प्रस्थान करेल. त्यानुसार 29 जुलै वाखरी, 30 जुलै वेळापूर, 31 जुलै नातेपुते, 1 ऑगस्ट फलटण, 2 ऑगस्ट पाडेगाव, 3 ऑगस्ट वाल्हे, 4 ऑगस्ट सासवड, 5 ऑगस्ट हडपसर, 6 ऑगस्ट पुणे आणि 8 ऑगस्ट रोजी पालखी आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर 9 ऑगस्ट रोजी आळंदीत पालखीची नगरप्रदक्षिणा होऊन हजेरी मारुती मंदिर येथे नारळ प्रसादाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पालखी श्री माऊली मंदिरात दाखल होणार आहे.