‘बाबाची लाईफलाईन…’ मान्यता दत्तच्या बोल्ड मिरर सेल्फीवर चाहते फिदा

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. संजय प्रोफेशनल लाइफपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. अभिनेत्याप्रमाणेच त्याची पत्नी आणि अभिनेत्री मान्यता दत्तही नेहमीच चर्चेत असते. मान्यता आज अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिला जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. मान्यताचा प्रत्येक फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल होतो.मान्यताने नुकताच पोस्ट केलेला एक बोल्ड फोटो सध्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने ब्लॅक अँड व्हाइट चमकदार शॉर्ट ड्रेस घातला आहे. तिचा हा ड्रेस अतिशय ट्रान्सपरंट आहे.ज्यामुळे तिचा लूक आणखी जबरदस्त वाटत आहे.मान्यताने आरशासमोर घेतलेला हा मिरर सेल्फी सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
या फोटोतील मान्यताची बोल्ड अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. यापूर्वी देखील मान्यताच्या सोशल मीडियावरील अनेक पोस्ट व्हायरल झालेल्या आहेत. पार्टी असो वा फ्रेंड्सचा बिर्थडे मान्यता नेहमीच सोशल मीडियावर संक्रिय असते. आता देखील मान्यताने पोस्ट केलेला हा मिरर सेल्फी चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
View this post on Instagram
मान्यता दत्तच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार कमेंटबाजी केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तू इतकी सुंदर कशी दिसतेस?’ मान्यताच्या या फोटोवर संजय दत्तच्या चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.’बाबाची लाईफलाईन’ अशी कमेंट करत एकाने थेट मान्यता आणि संजय दत्तचा फोटो कमेंटमध्ये पोस्ट केला आहे.




