मुंबई -बॉलिवूड अभिनेता संजय दत्त म्हणजेच, सर्वांचा लाडका संजू बाबा कॅन्सरमुक्त झाला आहे. संजय दत्त अनेक चित्रपटांत झळकणार आहेत. यातच संजय दत्तच्या हेअर कटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
त्यांचे हे हटके फोटो हेअर स्टाईलिस्ट आलिम हकीमनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. संजय दत्तची ही हेअर स्टाईल सेलिब्रिटी हेअर स्टाईलिस्ट आलिम हकीमनं केली आहे. सध्या या फोटोला सोशल मीडियावर चांगली मिळाली आहे.
अलिमने त्याचे फोटो शेअर करत रॉकस्टार संजय दत्त नव्या प्लॅटिनम बॉन्ड हेअर लूकमध्ये, असं कॅप्शन दिलं आहे. तर सोशल मीडियावर त्याच्या या नव्या लुक ला फॅन्स कडून चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे . फॅन्सने ‘संजू बाबा यू आर सो कूल’ म्हणत त्याच्या नव्या लुक ला पसंती दिली आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास संजय दत्त अनेक चित्रपटांत झळकणार आहेत. यात शमशेरा, केजीएफ चॅप्टर-2, पृथ्वीराज, भुज ः द प्राइड ऑफ इंडिया आणि तोरबाज आदी चित्रपटांचा समावेश आहे. यातील काही चित्रपटांचे शूटिंग पूर्ण झाले आहेत, तर काही चित्रपटाचे थोडेफार काम बाकी आहे.