Salman Khan-Sanjay Datt : संजूबाबा-भाईजान हॅालीवूड पिक्चरमध्ये दिसणार एकत्र? नेटकऱ्याकडून ‘तो’ व्हिडिओ शेअर

बॅालीवूडचा भाई जान अर्थात सलमान खानचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सौदी अरेबियाचा असल्याचे बोलले जात आहे. जिथे सलमान त्याच्या पहिल्या हॅालीवूड चित्रपटाचे शूटिंग करत असल्याचे सांगण्यात आले आहे. सलमान दिग्दर्शक रॉड्रिगो गुरेरो यांच्या स्पॅनिश चित्रपटात काम करत आहे. तो लवकरच सेव्हन डॉग्सच्या रिमेकमध्ये दिसणार आहे. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत सलमान एका भारतीय ऑटो ड्रायव्हरच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
सलमानच्या एका फॅन पेजने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे. लीक झालेला हा व्हिडिओ सौदी अरेबियाचा असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये सलमान ऑटोरिक्षा चालकाच्या वेशभूषेत आहे. एका ऑटो रिक्षासमोर तो उभा आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत संजय दत्तही दिसत आहे. हा व्हिडिओ ‘द सेव्हन डॉग्स’च्या सेटवरील असल्याचे बोलले जात आहे. ज्यामध्ये सलमान आणि संजय दोघेही कॉमेडी करताना दिसणार आहे.
यापूर्वी व्हायरल झालेल्या सलमानच्या व्हिडिओमध्ये प्रॉडक्शनने सौदीमध्येच धारावी उभारली होती. या दुसऱ्या व्हिडीओमध्ये मुंबईतील रस्त्यांचा सेटअपही तयार करण्यात आला आहे. सलमानची खाकी वर्दी पाहून लोक अंदाज लावत आहेत की सलमान एकतर ऑटो ड्रायव्हर किंवा मग एजंटची भूमिका करत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, हा एक अमेरिकन चित्रपटातील थ्रिलर सीन आहे. ज्यामध्ये सलमान आणि संजय दत्तच्या छोट्या पण महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.
Bhai and Baba are in Saudi Arabia to shoot cameo for a Hollywood movie 🎥… #Salmankhan #Sanjaydutt #Sikandar pic.twitter.com/ZoTZ6mNae4
— Adil Hashmi👁🗨 (@X4SALMAN) February 19, 2025
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, सलमान सेव्हन डॉग्सच्या रिमेकसाठी काम करत आहे. मिड डेच्या वृत्तानुसार हा हॉलिवूडचा चित्रपट असणार आहे. ज्याची घोषणा काही दिवसांत होईल. सेव्हन डॉग्सबद्दल बोलायचे झाले तर हा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट होता. ज्याची कथा एका अपार्टमेंटमध्ये आपल्या सात कुत्र्यांसह एकटा राहणाऱ्या माणसाची आहे.
सिकंदरची उत्सुकता
सलमान खान लवकरच ‘सिकंदर’मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. चित्रपटाच्या पोस्ट-प्रॉडक्शनवर काम करण्यात येत आहे.





