Sanjiv Goenka share post for Vaibhav Suryavanshi : आयपीएल २०२६ च्या ६४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने अशी दमदार खेळी साकारली की, त्याने केवळ सामनाच जिंकला नाही, तर विरोधी संघाच्या मालकाचेही मन जिंकले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने दिलेल्या २२१ धावांच्या अवाढव्य आव्हानाचा पाठलाग करताना वैभवने ३८ चेंडूंत ९३ धावांची महाभयंकर खेळी केली. त्याच्या या वादळात लखनौचा पराभव झाला असला, तरी लखनौ संघाचे मालक संजीव गोयंकांनी त्याचे कौतुक केले. मैदानात घडला दुर्मिळ प्रसंग; गोयंका-लँगर उभे राहिले! या सामन्यात वैभव सूर्यवंशी अवघ्या ७ धावांनी आपल्या शतकाला मुकला. तो ९३ धावांवर मोहसिन खानच्या चेंडूवर झेलबाद होऊन जेव्हा पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा मैदानावर क्रीडा जगताला थक्क करणारा प्रसंग घडला. एलएसजीचे मालक संजीव गोयंका आणि मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर हे दोघेही आपल्या जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवून या १५ वर्षांच्या पोराचे कौतुक केले. एवढेच नव्हे, तर सामन्यानंतर वैभव जेव्हा चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता, तेव्हा संजीव गोयंका स्वतः चालत त्याच्यापाशी गेले आणि त्यांनी वैभवशी बराच वेळ संवाद साधला. संजीव गोयंकांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट – The world has seen your talent. The nation sees the future in you. That’s a lot of responsibility already on very young shoulders, very able ones at that. Preserve the innocence, keep honing your brilliance, and the world will be at your feet. Prayers, aashirwad, and love for… pic.twitter.com/LZS7pEe93s — Dr. Sanjiv Goenka (@DrSanjivGoenka) May 20, 2026 सामन्यानंतर संजीव गोयंका यांनी ‘एक्स’वर वैभवसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले, “संपूर्ण जगाने तुझी प्रतिभा पाहिली आहे. हा देश तुझ्यामध्ये आपले भविष्य पाहत आहे. खूप लहान खांद्यांवर आधीच मोठी जबाबदारी आली आहे, पण हे खांदे तितकेच सक्षम आहेत. तुझा हा निरागसपणा असाच नेहमी जपून ठेव. एक दिवस संपूर्ण जग तुझ्या पायाशी असेल. वैभव, तुला माझा आशीर्वाद आणि खूप प्रेम!” हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Celebration : अर्ध्या तासातच उघडं झालं वैभवच्या सेलिब्रेशनचं गुपित; कोच रोमी भिंडरच्या प्रश्नावर झाला भावूक! पाहा VIDEO एकाच हंगामात ५० षटकार! वैभवने रचला महाविक्रम लखनौने प्रथम फलंदाजी करत २२० धावा कुटल्या होत्या. प्रत्युत्तरात वैभवने २४४.७४ च्या स्ट्राईक रेटने ७ चौकार आणि तब्बल १० गगनचुंबी षटकार ठोकले. या खेळीसह वैभव आयपीएलच्या एकाच हंगामात ५० षटकार ठोकणारा इतिहासातील पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. वैभव बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलने (नाबाद ५३ धावा) डाव सांभाळला आणि डोनोव्हन फरेराने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून राजस्थानला ७ विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.