मंचर : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे प्रहार जनशक्ती दिव्यांग बांधवांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय थोरात यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेले अनेक वर्ष समाज कारणामध्ये काम करत असताना सामाजिक कार्य,शिक्षण,आरोग्य, दिव्यांग सेवा,पर्यावरण, ग्रामविकास इत्यादी समाजहितासाठी केलेल्या सततच्या कार्यामुळे नि:स्वार्थ सेवेमुळे आणि जनकल्याणाच्या बांधिलकीमुळे समाजात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष यांच्यावतीने “समाजभूषण पुरस्कार” हा मानाचा सन्मान संजय थोरात यांना देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना कधीही कोणाची जात, पात,धर्म,पक्ष,पार्टी न पाहता नागरिकांची झालेली कामे हीच मला मिळालेल्या पुरस्काराची पावती आहे.