‘PM मोदी, मुजरा, मटण यावर बोलतात. त्यांना तरुणांची चिंता नाही…’ आप नेत्याने साधला निशाणा

Sanjay Singh । आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आज NEET-UG परीक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध केला. ‘आप’चे नेते जंतरमंतरवर जमले आणि त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह म्हणाले की, ‘तुम्हाला अग्निवीर बनवून तुमच्या पोटावर आणि छातीवर लाथ मारली जात आहे. चार वर्षांत पेपरफुटीमुळे देशातील 2 कोटी मुलांचे भविष्य बिघडले आहे. देशाचे पंतप्रधान मुजरा, मटण यावर बोलतात. पंतप्रधानांना तरुणांची चिंता नाही.’ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.
Sanjay Singh । NEET परीक्षेचा मुद्दा संसदेत मांडणार…
निदर्शनादरम्यान संजय सिंह यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला. हा मुद्दा आम्ही संसदेच्या अधिवेशनात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा शिक्षण मंत्रालयाचा घोटाळा आहे. मुलांच्या भविष्याशी खेळू दिला जाणार नाही.
Sanjay Singh । सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला फटकारले…
NEET UG परीक्षा लीक झाल्याची बाब समोर आल्यापासून मोठ्या संख्येने विद्यार्थी पुन्हा परीक्षेची मागणी करत आहे. सध्याच्या परीक्षेच्या निकालांना स्थगिती देऊन परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यावर अनेकवेळा सुनावणी झाली आहे. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) फटकारले आणि म्हटले,’जर कोणाकडून 0.001% निष्काळजीपणा असेल, तर त्यावर पूर्णपणे कारवाई केली पाहिजे. मुलांनी परीक्षेची तयारी केली आहे, आम्ही त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही.’





