Sanjay Shirsat । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामाजैक कार्यात नेहमी अग्रेसर असतात . त्यांच्या याच सामाजिक कार्याचे तोंडभरुन कौतुक भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख ‘माँ’ असा केला होता. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कुणाला काय म्हणून हाक मारावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न Sanjay Shirsat । याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, मंगलप्रभात लोढा यांनी कुणाला काय म्हणून हाक मारावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या विषयावर शिरसाट यांनी अधिक बोलणे टाळले. यावेळी संजय शिरसाट यांनी महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ‘गणपती विसर्जन झाले असून आता दोन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी बैठका सुरु होतील. कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा आणि नावे जाहीर होणार. नेते या सगळ्याबाबत घोषणा करणार आहेत. मजबूत सरकार आणण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, मात्र, कोण मुख्यमंत्री होणार, हे सर्व वरिष्ठ नेते ठरवतील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. उद्यापासून या बैठकांना सुरुवात होईल. प्रथम अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होईल. वरिष्ठांनी हिरवा कंदील दिल्यानंतर तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असेही शिरसाट यांनी म्हटले. मंगलप्रभात लोढा नेमकं काय म्हणाले? Sanjay Shirsat । मी अमृता फडणवीस यांना विनंती करतो की, तुम्ही चौपाटीवरील कचरा साफ करतात हे चांगली गोष्ट आहे. मात्र, राज्यातील राजकारणात जो कचरा आलेला आहे तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत त्यामुळं मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेन, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.