माढा लोकसभा : शरद पवारांच्या उपस्थित संजय शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातून आज संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमान शेतकरी संघटना, मनसे, आरपीआय इत्यादी मित्रपक्ष महाआघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह आ.गणपत आबा देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर,आ.बबनदादा शिंदे, आ.भारतनाना भालके,काकासाहेब साठे, दिपकआबा साळुंखे-पाटील, रश्मीदिदी बागल, राजुबापु पाटील, युवराज पाटील,दिग्विजय बागल व पक्षाचे कार्यकर्ते, विविध पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि पक्षाचे उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे इथं आता जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.