Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल २८ जानेवारी रोजी भीषण विमान अपघातात निधन झाले. अजित दादांची अशी अकाली एक्सिट सगळ्यांच्याच मनाला चुटका लावणारी आहे. आज २९ जानेवारी रोजी त्यांच्यावर शासकीय इंतमामात बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यानंतर आता संजय राऊत यांनी एक्सवरून एक ट्वीट करत मोठी मागणी केली आहे. या ट्वीटची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अजित पवार यांच्या अत्यंविधीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मोठे नेते पदाधिकारी, कार्यकर्ते याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्षाचे नेते उपस्थित होते. या सर्वांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आज अनेक वर्तमान पत्रात अजित पवार (Ajit Pawar ) यांना श्रद्धांजलीच्या जाहीराती छापून आल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी ट्वीटद्वारे आक्षेप नोंदवत मोठी केली आहे. भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेचपं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल @Dev_Fadnavis @narendramodi pic.twitter.com/bk1a61mVcd — Sanjay Raut (@rautsanjay61) January 29, 2026 संजय राऊत काय म्हणाले? भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. हेही वाचा : PSO Vidip Jadhav : शेवटपर्यंत दादाची साथ सोडली नाही ; अजित पवारांचे PSO विदीप जाधवांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार