Sanjay Rauta : “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, संजय राऊतांनी बावनकुळेंचा ‘तो’ फोटो केला ट्वीट

Sanjay Rauta : शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील एक फोटो शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. फोटो शेअर करत राऊतांनी “महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा” आरोप संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवर दोन फोटो ट्वीट केले आहेत. त्यावर,“महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”असे एका फोटोवर म्हटले आहे.
महाराष्ट्र पेटलेला आहे…
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
तर दुसरा फोटो शेअर करत, “१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक सवालही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला आहे.
19 नोव्हेंबर
मध्यरात्री
मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine.
साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात.
हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे?
ते तेच आहेत ना?@BJP4Maharashtra @AUThackeray @Dev_Fadnavis @AmitShah pic.twitter.com/XlScC63h2Q— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी, “महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा फोटो समोर आला आहे. या फोटोचा तपास केला पाहिजे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे.” असे म्हणत राज्य सरकार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.





