Nana Patole – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपुर्वीच भाजपचे अनेक आमदार आमच्याकडे येणार असल्याचा दावा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झाल्यानंतर पटोले पत्रकारांशी बोलत होते. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील मित्रपक्षांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले की, ‘येत्या काही दिवसांत भाजप आणि मित्रपक्षांचे अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर भंडारा येथील माजी खासदार पटले म्हणाले की, भाजप हा पक्ष आता पुर्वीचा राहिलेला नाही, हा पक्ष आता ठेकेदार आणि व्यापाऱ्यांचा पक्ष झाला आहे. या पक्षाचा शेतकरी आणि कामगार वर्गाशी संबंध उरलेला नाही, असे ते म्हणाले. भाजपने विरोधी पक्षांना फोडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला आहे. लोकांसाठी काम करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला,असे पटले म्हणाले.