शिंदे-ठाकरे भेटणार ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटबाबत संजय राऊत म्हणतात…

नवीदिल्ली – एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अंतर वाढत चालल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातच अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुढील २ दिवसात भेट होणार असल्याचे ट्विट केले आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्च्यांना उधाण आले. आता याबाबत खासदार संजय राऊत यांनी देखील भाष्य केलं आहे.
“दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. त्या पक्षाचं काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही असं स्पष्ट मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे”. एका वृत्त वाहिनीशी बोलताना राऊत यांनी सय्यद यांच्या ट्विटवर भाष्य केलं. “त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत. पदाधिकारी आहेत. तसंच प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे”, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.
@OfficeofUT
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
दीपाली सय्यद यांचं ट्विट
येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.





