Sanjay Raut : ‘त्या’ फोटोवरून संजय राऊतांचा भाजपला टोला; म्हणाले,”बावनकुळेंचं नाव घेत भाजपावालेच हिट विकेट झाले”

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सहकुटुंब मकाऊ येथे सुट्टीवर गेले असताना कॅसिनो खेळत असल्याचे छायाचित्र ट्वीट केल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. परंतु, यावरून आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा तोच फोटो एक्सवर पोस्ट करत भाजपावर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत,” मी माझ्या ट्वीटमध्ये कोणाचं नाव घेतलं होतं का? किंवा कोणावर आरोप केले होते का? नाही! मी फक्त एवढंच म्हटलं होतं की महाराष्ट्र जळत असताना काहीजण मकाऊमध्ये व्यस्त आहेत.” असे म्हटले होते. त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा राऊत यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
महाराष्ट्र पेटलेला आहे…
आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत.
फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…@BJP4Maharashtra @AmitShah @AUThackeray @Dev_Fadnavis pic.twitter.com/cfhswYn7Zx— Sanjay Raut (@rautsanjay61) November 20, 2023
दरम्यान, काल संजय राऊत यांनी,‘महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथील कॅसिनोत जुगार खेळत आहेत’ अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली होती. याबरोबरच बावनकुळे कॅसिनोमध्ये बसले असल्याचे छायाचित्र जोडले. कॅसिनोमधील जुगारात बावनकुळे यांनी साधारण साडे तीन कोटी उडविल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय खेळले तर बिघडले कोठे, असेही ट्वीट राऊत यांनी केले होते.
तर दुसरीकडे त्यांनी केलेल्या या ट्विटवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत,‘मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या तळ मजल्यावर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असा खुलासा त्यांनी केला.





