Sanjay Raut on Nashik Violence । राज्यातील नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या दर्ग्याचे पाडकाम केल्यावरून आता सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री काही लोकांनी दर्गा हटवण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर दगडफेक केली. याला प्रत्युत्तर म्हणून पोलिस पथकाने पुन्हा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आधी औरंगजेबाची कबर हटवण्यावरून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वाद सुरु आहेत आणि आता दर्गा प्रकरण समोर आले आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने(उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. भाजपवर आरोप करताना त्यांनी असा दावा केला की, भाजप दंगल भडकवण्यासाठी योग्य वेळ आणि ठिकाणाची वाट पाहत आहे. आमच्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे नाशिकमध्ये दंगलनीती Sanjay Raut on Nashik Violence । राज्य सरकारवर टीका करताना संजय राऊत यांनी, “ज्यांच्याकडे सत्ता आहे ते अजूनही आम्हाला घाबरतात. आज दर्गा हटवण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली, आज आमचा मोठा मेळावा आहे. लोकांचे लक्ष आमच्यावरुं हटवण्यासाठी त्यांनी हे केले आहे.” संजय राऊत म्हणाले की, “ही कारवाई नंतरही करता आली असती. १५ दिवसांपूर्वीच ठरवले होते की ते आजच कारवाई करणार. एवढेच नाही तर, भाजप नेहमीच कधी आणि कुठे दंगल भडकवायची याची वाट पाहत असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक पोलिसांनी काय म्हटले? Sanjay Raut on Nashik Violence । पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी, “बांधकाम हटवण्यासाठी एक पथक आले, पण त्याच वेळी जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. दर्ग्याचे विश्वस्त आणि एक प्रतिष्ठित नागरिक त्यांना समजावण्यासाठी गेले, परंतु त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली.” माहिती दिली. ३१ पोलिस अधिकारी जखमी, १५ दंगलखोरांना ताब्यात यावेळी काही गाड्यांचे नुकसान झाले आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बळाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे. पोलिसांनी १५ गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. त्याच वेळी, ५७ संशयितांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ३१ पोलिस आणि कर्मचारी अधिकारी जखमी झाले आहेत. हेही वाचा वक्फ कायद्यावर कायदेशीर लढाई सुरू! आज १० याचिकांवर होणार सुनावणी ; ‘या’ पक्षांनी दिले आव्हान