Sanjay Raut on Jayakumar Gore। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. कारण काल संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. तर आता महाविकास आघाडीने महायुतीमधील दोन मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी उत्तर महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांची जमीन हडपल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केले आज सकाळी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेटसारखे प्रकरण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका संजय राऊतांनी यावेळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा, मंत्री गोरे यांनी छळ आणि विनयभंग केला आहे, त्याची माहिती समोर आल्याचेही राऊतांनी म्हटले आहे. ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा मोठा दावा त्यांनी केला. दरम्यान या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा पिसले पाहिजे Sanjay Raut on Jayakumar Gore। संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. आता हे नवीन पात्र तुमच्या मंत्रिमंडळात समोर आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे, असा सल्ला राऊत यांनी दिला आहे. त्यांनी सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. ही सर्व रत्नं, 14 आहेत की जास्त, ती त्यांनी तपासली पाहिजे. जयकुमार गोरे यांच्याविषयी जी माहिती समोर आली आहे, ती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे, असे ते म्हणाले. राज्यात महिला आयोग काय करतोय ? Sanjay Raut on Jayakumar Gore। या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे ते म्हणाले. तर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी याविषयी का बोलत नाही?. सर्वच पक्षातील महिला पदाधिकारी, आमदार का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तर महिला आयोग कुठंय अशी विचारणा त्यांनी केली.