Sanjay Raut on Eknath Shinde । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर ‘मुख्यमंत्री’ पदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. याप्रकरणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य समोर आले आहे. महाराष्ट्राशी संबंधित सर्व बाबींचा निर्णय आता दिल्लीतुन घेतला जाणार, असा टोलाही त्यांनी लगावला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुन्हा पुन्हा दिल्लीत यावे लागणार आहे. त्यांना पंतप्रधान आणि अमित शहा यांचेच म्हणणे ऐकावे लागणार असल्याचे म्हटले. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्यापूर्वी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज किंवा उद्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. काय म्हणाले संजय राऊत? Sanjay Raut on Eknath Shinde । शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “अजित पवार हे नेहमीच उपमुख्यमंत्री होते आणि यापुढेही उपमुख्यमंत्री राहतील”असे म्हणत त्यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला. पुढे बोलताना त्यांनी, “लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या चेहऱ्यावरची चमक आता परत आली आहे, हाच चमत्कार EVM चा आहे. एक ‘तीन मूर्ती’ मंदिर बांधले पाहिजे, ज्यामध्ये मध्यभागी ईव्हीएम असेल, एका बाजूला पंतप्रधान आणि दुसऱ्या बाजूला अमित शहा असतील.” असेही त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी फेरनिवडणुकीची केली मागणी Sanjay Raut on Eknath Shinde । खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ईव्हीएममध्ये अनियमितता असल्याचा आरोप करत महाराष्ट्रात पुन्हा बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या अनेक तक्रारी आल्याचा आरोप करत नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत म्हणाले, “आम्हाला ईव्हीएमबाबत सुमारे 450 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वारंवार आक्षेप घेऊनही या प्रकरणांवर कोणतीही कार्यवाही झाली नाही. या निवडणुका निष्पक्षपणे पार पडल्या असे कसे म्हणायचे? त्यामुळे निकाल रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, अशी माझी मागणी आहे. MVA चा भाग असलेल्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 95 जागा लढवल्या आणि फक्त 20 जागा जिंकल्या “असेही त्यांनी म्हटले. हेही वाचा ‘एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत’ ; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले,” असे करणे म्हणजे…”