संजय राऊत म्हणाले,”छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा…”

Sanjay Raut on Chhagan Bhujbal । लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत नाराजी नाट्य सुरु असल्याचे म्हटले जात आहे. लोकसभा आणि राज्यसभेत डावलल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच चर्चांवर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भुजबळ प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. छगन भुजबळ आणि शिवसेनेचा आता कोणताही संबंध नाही. आमच्यात बोलणी सुरु आहेत, अशा निव्वळ पसरवल्या जात आहेत. जेणेकरून राजकीय संभ्रम निर्माण होईल. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या वृत्ताचे खंडन केले.
भुजबळांसोबत कोणताही संवाद झाला नाही Sanjay Raut on Chhagan Bhujbal ।
संजय राऊत यांनी,”छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्याला बराच काळ उलटला. त्यानंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि आता अजितदादा गटात आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेचे वळण बरेच मागे पडले आहे. त्यामुळे आपण बोलताय त्या अफवेत तथ्य नाही. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाही, तो होण्याची शक्यता नाही. कारण भुजबळांनी स्वत:चा मार्ग निवडला आहे. त्यांच्या आताच्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खाणार नाहीत. ते शिवसेनेत येणार अशा बातम्या उडवून महाराष्ट्रात गोंधळ उडवला जात आहे. पण छगन भुजबळ यांना शिवसेनेचा कोणताही नेता भेटलेला नाही, भेटणारही नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
… तर तेलुगू देसमचा नक्की विचार करु Sanjay Raut on Chhagan Bhujbal ।
भविष्यात तेलुगू देसम पक्षाकडून काही प्रस्ताव आला तर इंडिया आघाडीकडून त्याचा नक्कीच विचार केला जाईल. आम्ही गप्प बसणार नाही, जिथं जिथं संधी मिळेल आम्ही विरोध करणार, असे संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेना ही बेईमान लोकांना छातीवर घेऊन नाही तर निष्ठावंतांनी शिवसेना इथपर्यंत आणली आहे. डबल इंजिनवाली युती मग ट्रिपल झाली, मग मनसेला सोबत घेतलं… काय झालं? अजून काही छुपे इंजिनपण आहेतच. त्यांनी आता महाराष्ट्रात 400 पार करावेत, आमची काहीत हरकत नाही, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला.





