Sanjay Raut : CM फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाची संजय राऊतांनी उडवली खिल्ली म्हणाले “नवे रामायण…”
Sanjay Raut : या चित्रपटाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाची उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : बहुप्रतिक्षित रामायण चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांना मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळला. तब्बल ४ हजार कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ट्रेलर समोर आल्यानंतर त्यातील तांत्रिक बाबींसह स्टारकास्टचं कौतुक करण्यात आलं. तर सोशल मीडियावरुन काहींनी नापसंती देखील दर्शवली होती. या चित्रपटाविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाची उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी खिल्ली उडवली आहे. (Sanjay Raut)
नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावच्या (Goregaon) फिल्मसिटीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी एक विधान केलं. ज्यानंतर संजय राऊतांनी सोशल मीडिया एक्सवरुन खोचक शब्दांत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटातील कास्टचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले ” रामायण सिनेमाला ऑस्कर न मिळाल्यास त्यांच्या ज्युरींपासून मी निराश होईल, ‘रामायण’ सिनेमाची आम्हाला देखील उत्सुकता आहे.” यानंतर संजय राऊतांनी एक्स अकाऊंटवरून एक ट्वीट शेअर केलं आहे. (Sanjay Raut)
श्री देवेंद्रजी,
आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!
विषय राहिला ऑस्कर चा,
ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच Ed आणि सीबीआय पाठवा साहेब,
काम सोपे आहे
किंवा ज्युरी चा गट फोडण्यासाठी अमित शहा याना पाठवा
चिंता नाही करायची! pic.twitter.com/m1rZ4CH4qM— Sanjay Raut (@rautsanjay61) August 7, 2026
अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे : संजय राऊत
श्री देवेंद्रजी, आधी राम मंदिरातील दान पेटी चोरीवर बोला अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपा ने लिहिले आहे!
विषय राहिला ऑस्कर चा, ज्युअरी मंडळींच्या घरी लगेच Ed आणि सीबीआय पाठवा साहेब, काम सोपे आहे किंवा ज्युरी चा गट फोडण्यासाठी अमित शहा याना पाठवा चिंता नाही करायची! या ट्वीटमधून राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
रामायण चित्रपटाची चर्चा (Sanjay Raut)
सध्या नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी दिग्दर्शिक केलेल्या रामायण चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दिवाळीत या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपटाची भव्यता लक्षात येते. प्रभू श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, माता सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आहे. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत.





