शिवसेना-भाजपा-मित्र पक्षांच्या वतीने शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रा. संजय मंडलिक यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश अबिटकर, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आरपीआयचे अध्यक्ष उत्तम कांबळे उपस्थित होते. अर्ज भरताना भाजपाचे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला; परंतु शिवसेना-भाजपा-मित्रपक्षांचे जिल्ह्यातील सर्व नेते, आमदार पदाधिकारी मदत करतील अशी अपेक्षा शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केली.