Sanjay Gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या वादावरून निर्माण झालेल्या प्रकरणात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली असली, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, या भूमिकेवर ते ठाम असल्याचे स्पष्ट केले. (Sanjay Gaikwad) या प्रकरणात गायकवाड यांनी पुस्तकाचे कव्हर पाहूनच संताप व्यक्त करत आंबी यांना धमकी दिल्याचा आरोप होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर तीव्र टीका झाली, तसेच राजकीय स्तरावरही सावध प्रतिक्रिया उमटल्या. आंबी यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. (Sanjay Gaikwad) Sanjay Gaikwad : शिवीगाळ प्रकरणी संजय गायकवाडांची माघार! दिलगिरी व्यक्त केली, पण ‘या’ भूमिकेवर ठाम स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले, “अलीकडील वादात माझ्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले, याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मात्र हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हायला हवा.” (Sanjay Gaikwad ) दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते उदय सामंत यांनीही भूमिका स्पष्ट केली. “गायकवाडांनी नेमका कोणत्या बाबीवर आक्षेप घेतला, हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहे. पुस्तक वाचल्यानंतरच यावर सविस्तर मत मांडता येईल,” असे त्यांनी सांगितले. (Sanjay Gaikwad)