संजय दत्तचे नव्या क्षेत्रात पाऊल; मुंबईत सुरू केलं रेस्टॉरंट

Sanjay Dutt | बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने नवी सुरुवात केली आहे. त्याने नुकतेच स्वत:चं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे मुंबईत रेस्टॉरंट्स आहेत. आता या यादीत संजय दत्तचे नावही सामील झालं आहे.
संजय दत्त आता अभिनेता असण्यासोबतच उद्योजकही बनला आहे. शनिवारी त्याने मुंबईत आपल्या रेस्टॉरंटच्या लॉन्च पार्टीचं आयोजन केलं. या रेस्टॉरंटचं नाव ‘सोलेअर रेस्टॉरंट’ आहे. या शानदार कार्यक्रमात अभिनेत्याने आपल्या पत्नीसोबत प्रवेश केला. दोघांचाही लूक अत्यंत स्टायलिश दिसत होता.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संजय दत्त काळ्या टी-शर्टसह डिझायनर लेदर जॅकेटमध्ये दिसला. तर अभिनेत्याची पत्नी मान्यता दत्त शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. मान्यताने आपला लूक ग्लॉसी मेकअप, हाय हिल्स आणि मॅचिंग बॅगसह पूर्ण केला. या जोडीचा हा रॉयल लूक चाहत्यांना खूप आवडला आहे आणि अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये या जोडीचं कौतुक केले.
दरम्यान, संजय दत्तचे हे रेस्टॉरंट मुंबईतील बीकेसी येथील ग्रँड हयात येथे आहे. संजय दत्तचं रेस्टॉरंट कालपासून खाद्यप्रेमीसाठी सुरू झालं आहे. काही दिवसांपुर्वीचं संजय दत्तनं एक नवीन रेस्टॉरंट दुबईत सुरु केलं होतं. त्याच्या या रेस्टॉरंटचं नाव ‘दत्त्स फ्रँकटी’ असं आहे. Sanjay Dutt |
कामाबद्दल बोलायचे झाले तर, संजय दत्त अलीकडेच ‘बागी ४’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ, हरनाज कौर संधू आणि सोनम बाजवा यांनी भूमिका केल्या होत्या. याशिवाय तो ‘धुरंधर’ मध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट याच वर्षी 5 डिसेंबरला रिलीज होईल. Sanjay Dutt |
हेही वाचा:
आजपासून ‘या’ वस्तू झाल्या महाग ; आता ‘या’ वस्तूंवर ४०% जीएसटी लागणार





