लोणी धामणी – करोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा देत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना पुनित बालन ग्रूपच्या वतीने शुक्रवारी (दि. 31) रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे व हॅंड सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
हे वाटप पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय उपविभाग खेड तसेच पुणे ग्रामीण विभागातील राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव पोलीस ठाणे येथे शासन नियमानुसार सामाजिक अंतर ठेवत, मास्क लावून ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पुनित बालन ग्रुप पुणेचे सदस्य चेतन लोखंडे यांच्या वतीने करण्यात आले.