Sania Mirza: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा गेल्या वर्षी जानेवारीत घटस्फोट झाला. त्यांच्या या विभक्त होण्यानंतर सानियाने आयुष्यात एक कठीण काळ पाहिला. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. फराह खानचा खुलासा बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान सानिया मिर्झाच्या ‘Serving It Up with Sania’ या पॉडकास्टमध्ये पाहुणी म्हणून आली होती. या दरम्यान तिने सांगितले की, “घटस्फोटानंतर सानिया एका अतिशय अवघड काळातून गेली. तिला त्या काळात पॅनिक अटॅक यायचे. पण सिंगल मदर म्हणून तिने जेवढं धैर्य दाखवलं, ते खरंच प्रेरणादायी आहे.” फराहने पुढे सांगितलं की, सिंगल मदर म्हणून आयुष्य जगणं किती कठीण असतं हे ती समजू शकते. “काम सांभाळणं, जबाबदाऱ्या पार पाडणं हे सगळं एकट्याने करणं सोपं नाही,” असं ती म्हणाली. “मी थरथरत होते…” – सानिया मिर्झा सानियाने या पॉडकास्टमध्ये आपला भावनिक अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मी कॅमेरासमोर हे बोलू इच्छित नव्हते, पण एक वेळ अशी आली होती की मी पूर्णपणे खचले होते. त्या दिवशी मला एक लाइव्ह शो करायचा होता, पण मी इतकी घाबरले होते की शरीर थरथरत होतं. जर फराह माझ्याकडे आली नसती, तर मी तो शो करू शकले नसते.” सानियाने सांगितले की, फराहने तिला खूप धीर दिला आणि म्हणाली, “काहीही झालं तरी तू तो शो करणार आहेस.” फराहनेही तो प्रसंग आठवताना सांगितलं, “मी त्या दिवशी शूटिंग करत होते, पण सानियाची अवस्था ऐकून मी सगळं सोडून थेट पायजमा आणि चप्पल घालून तिच्याकडे गेले. मी कधीच तिला पॅनिक अटॅकमध्ये पाहिलं नव्हतं. तो क्षण खूप भयानक होता.” सानिया मिर्झाने या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, तिचा प्रवास सोपा नव्हता, पण तिने प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड दिलं. आज ती केवळ टेनिस स्टार नाही, तर एक प्रेरणादायी सिंगल मदर म्हणूनही अनेक महिलांसाठी उदाहरण बनली आहे.