पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात 33 करोनाबाधित रुग्ण मंगळवारी (दि. 28) आढळले. दोन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
नव्याने करोनाबाधित आढळलेले रुग्ण हे सांगवी, सासवड, औंध, आळंदी, पिंपळे निलख, चिंचवड, पिंपळे गुरव, बोपोडी, पाषाण, रहाटणी, दिघी, काळेवाडी, सुतारवाडी, चिखली, दापोडी येथील रहिवाशी आहेत. करोनामुळे मृत झालेल्या रुग्णांमध्ये 42 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.चिंचवड आणि देहूरोड येथील हे रुग्ण आहेत.
दरम्यान, आज खडकी बाजार, कात्रज आणि चांदखेड (ता. मावळ) येथील तिघांना घरी सोडण्यात आले. 7 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात सध्या 47 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 24 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.