लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सांगलीत २० तलवारी जप्त

सांगली –  लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत सांगलीच्या वाळवा तालुक्यामधून पोलिसांनी तब्बल २० धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या तलवारींची किंमत ४० हजार रुपये आहे.

सोमनाथ दिनकर पाटील (वाळवा) आणि हणमंत काकासो जाधव (ता. वाळवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सांगली पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक संतोष डोके यांचे पथक आष्टा परिसरात गस्त घालत असताना वाळवा येथील सोमनाथ पाटील याने घरात तलवारींचा मोठा साठा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी पाटील याच्या घरावर छापा घालण्यात आला. त्यावेळी त्याच्या घरात १२ तलवारी सापडल्या. त्यानतंर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने आणखी ८ तलवारी नातेवाईक हणमंत जाधव याच्याकडे ठेवल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व तलवारी जप्त केल्या. त्यानतंर दोघांविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.