Sangli News : जत तालुक्यातील (Sangli News) कोसारी येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि सध्या सांगली कारागृहात असलेला अनिल यमगर याची सख्खी बहीण पद्मिनी बापू मदने (वय ६०, रा. कुपवाड) हिला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. तपासात धक्कादायक माहिती समोर आली (Sangli News) आहे की, कारागृहात असलेल्या अनिल यमगर याने आपली बहीण पद्मिनी हिच्यावर दादासो यमगर यांना दाखवून देण्याची जबाबदारी सोपवली होती. अनिलच्या सांगण्यावरून पद्मिनीने सांगली न्यायालयात मारेकऱ्यांना दादासो यांची ओळख पटवून दिली होती. इतकेच नव्हे, तर कोसारी येथील त्यांचे घर आणि वावरण्याच्या ठिकाणांची माहितीही मारेकऱ्यांना पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. Sangli News या कामासाठी मोठी सुपारी देण्यात आली होती. नागज फाटा येथून दादासो यमगर यांचे अपहरण करून त्यांना कर्नाटक राज्यातील मदभावी येथे नेण्यात आले होते, जिथे त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना निष्पन्न केले असून, पद्मिनी मदने ही यातील सहावी आरोपी आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेले तीन आरोपी ज्ञानू खोत, रोहित पाटोळे, हर्षद उर्फ गोट्या पैलवान आणि नव्याने अटक केलेली पद्मिनी मदने अशा चौघांनाही मंगळवारी कवठेमहांकाळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या चौघांच्याही पोलीस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यातील (Sangli News) अन्य दोन संशयित सुयश उर्फ स्वप्निल खुळे व अमर खताळ हे अद्याप फरारी आहेत. हे दोघेही पोलिसांना सातत्याने गुंगारा देत असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.