Sangli News : बंद घराचे कुलुप तोडून चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील तीन संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी (Sangli News) ताब्यात घेतले. तर एक जण परागंदा झाला आहे. मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या संशयितांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. घरफोडीतील रेकॉर्डवरील संशयित चोरीचे (Sangli News) दागिने विकण्यासाठी सांगलीतील सह्याद्रीनगर इराणी वस्ती येथे येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. यामध्ये सुदर्शन सुनील यादव (रा. वारणाली, सांगली), सार्थक सुनील सुतार (रा. संजयनगर, सांगली), मुनीब उर्फ बाब्या मुस्ताक भाटकर (रा. शामराव नगर, सांगली) अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 3 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना आढळला. Sangli News मेघनाथ हिरालाल साहू (रा. पालवी हॉटेलजवळ सांगली) परागंदा झाला आहे. पोलिसांनी त्या मुद्देमालातील (Sangli News) रोख रक्कम व दागिने पंचासमक्ष जप्त केले. मेघनाथ साहू याच्यासोबत सुमारे एक महिन्यांपूर्वी विश्रामबाग येथील विकास कॉलनी वारणाली येथील बंद घर फोडून त्यातील सोन्याचे दागिने आणि पैशांची चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. तर यातील उर्वरित दागिने मेघनाथ साहू याच्याकडे असल्याची माहिती दिली. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, प्रकाश पाटील, अतुल माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.