Sangli News : मणेराजुरीतील पाझर तलावात बुडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत (Sangli News) आई व मुलीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दोघींचे मूळ गाव पुसेसावळी (ता. खटाव) आहे.

Sangli News : तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथे बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत (Sangli News) आई व मुलीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत दोघींचे मूळ गाव पुसेसावळी (ता. खटाव) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणेराजुरी- वज्रचौंडे रस्त्यावरील भोसलेनगरच्या पुढे असलेल्या (Sangli News) चिमण खोरा पाझर तलावाजवळ सत्वाला संतोष जाधव (वय २८) या आपल्या मुलगी मंजु संतोष जाधव (वय ७) हिच्यासह धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या.
यावेळी मंजु हिचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. मुलीला वाचविण्यासाठी आई सत्वाला जाधव यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघींनाही पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडाल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तासगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोघींचे मृतदेह पुढील तपास व शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मृत आई-मुलीचे मूळ गाव पुसेसावळी (जि. सातारा) असून, मोलमजुरीच्या (Sangli News) कामासाठी हे कुटुंब सुमारे महिनाभरापूर्वी मणेराजुरी येथे वास्तव्यास आले होते. या दुर्दैवी घटनेमुळे मणेराजुरी परिसरासह पुसेसावळी गावावर शोककळा पसरली आहे.तासगाव पोलीस ठाणे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.






