Accident News : सांगली जिल्ह्यात भीषण रस्ते अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव कारने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, महेश मनोहर भमाणे हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी गावचे ग्रामसेवक होते. ते कारने जतवरून मिरजच्या दिशेने जात असताना कळंबी गावाजवळ हा भीषण अपघात घडला. (Accident News) सीसीटीव्ही फुटेजनुसार, महेश भमाणे यांची भरधाव कार महामार्गाच्या पहिल्या लेनमधून अचानक तीन लेन ओलांडत थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात महेश भमाणे यांचा जागीच मृत्यू झाला. (Accident News) अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. (Accident News)