नगर – अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी बबनराव रासकर आणि त्यांच्या पत्नी सौ.अंजनाबाई रासकर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दरम्यान, नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
(1/2)आज माझ्या #Ahmednagar दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी,ज्यांच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची ही लढाई आहे, अश्या माझ्या सर्व मायबाप जनता व शेतकरी बांधवांना मनःपूर्वक वंदन करून पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी श्री.बबनराव रासकर आणि त्यांच्या पत्नी सौ.अंजनाबाई रासकर यांच्या हस्ते pic.twitter.com/NpSGLIYM4G
— MLA Sangram Jagtap (@sangrambhaiya) April 2, 2019