Nagar | संगमनेरला ११ हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे वर्ग

संगमनेर, – राज्य शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धपकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ अखेरपर्यंत ११ हजार ६१४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ६५ लाख २० हजार १०० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती आमदार अमोल खताळ पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील गोरगरीब, वृद्ध, निराधार, दिव्यांग, विधवा, परितक्ता बंधू आणि भगिनींना वरील योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावांत शिबिरे राबविली. त्या माध्यमातून सप्टेंबर २०२४ अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजना, अनुसूचित जाती या प्रवर्गातील ६२० लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ९लाख २२ हजार २००रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २६२ लाभार्थ्यांना ३ लाख ९९ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या प्रवर्गातून ५ हजार ३७९ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ८० लाख ८३हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील ६८५ लाभार्थ्याच्या बँक खात्यावर १० लाख २७ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवाराज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ४ लाख ८४ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४ हजार ३३५ लाभार्थ्यांना ५६ लाख ३ हजार ४००, असे एकूण १ कोटी ६५ लाख २० हजार १०० रुपये खात्यावर वर्ग झाले.
उर्वरित लाभार्थ्यांचे अनुदान लवकरात लवकर वर्ग केले जाईल, असे आ.खताळ यांनी सांगितले.





