संगमनेर (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आरक्षणाच्या मुद्द्यावर संगमनेर सकल मराठा समाज पुन्हा एखादा एकवटला असून आक्रमकपणे रस्त्यावर उतरनार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात संगमनेर सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी सकाळी 10 वाजता संगमनेर बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोनल करणार आहे. यावेळी कोविड 19 साथरोगाच्या प्रतिबंधात्मक सर्व सुरक्षतेतेची काळजी घेऊन हे आंदोनल करणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते समाज बांधवांनी दिली आहे.
सरकार व सर्व पक्षाचे मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मराठा समाजाची मतांच्या गोळा बेरजेच्या राजकीय हेतूने टाळाटाळ करून मराठा समाजाला ठरवून आरक्षण मिळून देत नाहीये. तसेच आजपर्यंतच्या झालेल्या सर्व घडामोडींमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही.
त्याचे निषेधार्थ सर्वपक्षीय सकल मराठा समाज बांधव व सर्व मराठा संघटना मिळून निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता संगमनेर बस स्थानकासमोर कोविड 19 महामारीची परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाने घालून दिलेले सगळे नियम पाळून रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती संगमनेर सर्व पक्षीय सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी शरद नाना थोरात, अविनाश थोरात, अमोल खताळ, प्रशांत वामन, किरण घोटेकर, खंडू सातपुते, निर्मलाताई गुंजाळ, शंकर सातपुते, सुनील गुंजाळ, अण्णासाहेब काळे, अशोक सातपुते, गोकुळ लांडगे, सुहास पवार, नारायण खुळे, अमोल कवडे, धैर्यशील देशमुख, सुमित पवार, विनोद पानसरे, वैभव वामन, व्यंकटेश देशमुख आदी समाज बांधव उपस्थित होते.