‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर ‘सांग तू आहेस का’ची टीम

Updated On:
‘कॉमेडी बिमेडी’च्या मंचावर ‘सांग तू आहेस का’ची टीम

स्टार प्रवाहवरील ‘कॉमेडी बिमेडी’ आणि ‘सांग तू आहेस का’ या दोन्ही कार्यक्रमांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या दोन्ही कार्यक्रमांमधील कलाकार नुकतेच एका मंचावर आले. निमित्त होतं ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाच्या विशेष भागाचं. या खास भागात सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी यांनी खास हजेरी लावत विनोदाच्या मेजवानीचा आनंद लुटला.

https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/1010049746155173

आशिष पवार आणि आरती सोळंकी यांनी यानिमित्ताने खास स्किट सादर करत हास्याची तुफान फटकेबाजी केली. या धमाल विनोदी स्किटचं सादरीकरण पाहून सिद्धार्थ चांदेकर आणि संपूर्ण टीमला हसू आवरलं नाही आणि त्यांनी कॉमेडी बिमेडीच्या टीमचं भरभरुन कौतुक केलं.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निखळ हास्याचे क्षण कुठेतरी हरवत चालले आहेत. कॉमेडी बिमेडी कार्यक्रमाद्वारे हेच हरवलेले मजेशीर क्षण पुन्हा वेचण्याचा प्रयत्न आहे. विनोदाचं अफलातून टायमिंग आणि भन्नाट विनोदी किस्से जर अनुभवायचे असतील तर ‘कॉमेडी बिमेडी’ कार्यक्रमाचा या आठवड्यातील भाग नक्की पाहा.

आणखी संबंधित बातम्या

Rakesh Bapat: राकेश बापटच्या 'तुझ्याकडे तुला मागणे' मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री

2026-09-12 09:14:00

Rakesh Bapat: राकेश बापटच्या 'तुझ्याकडे तुला मागणे' मालिकेत झळकणार लोकप्रिय अभिनेत्री

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

2026-07-22 10:43:12

Aishwarya Narkar: ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’! ऐश्वर्या नारकरांचे 8 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन

Marathi Serial : नेमकं चाललंय तरी काय.? 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' नंतर आणखी एक मोठी मालिका बंद होणार; दिल 'हे' कारण...

2026-06-16 16:29:54

Marathi Serial : नेमकं चाललंय तरी काय.? 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' नंतर आणखी एक मोठी मालिका बंद होणार; दिल 'हे' कारण...

Jui Gadkari: “आईच्या साडीत जुई गडकरीचा मोहक अंदाज; ‘सायली’च्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!”

2026-05-05 10:11:30

Jui Gadkari: “आईच्या साडीत जुई गडकरीचा मोहक अंदाज; ‘सायली’च्या लूकने चाहत्यांना घातली भुरळ!”

Prajakta gaikwad : तब्बल ५ वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं रुपेरी पडद्यावर होणार कमबॅक; स्वतः दिली माहिती...

2026-04-29 12:46:00

Prajakta gaikwad : तब्बल ५ वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं रुपेरी पडद्यावर होणार कमबॅक; स्वतः दिली माहिती...