तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – ग्रामपंचायत इंदोरीचे उपसरपंचपदी संदीप नाटक बिनविरोध करण्यात आली. इंदोरीचे उपसरपंच स्वप्नील शेवकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी विशेष सभेत निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत शिंदे होते. तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी कैलास कोळी यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी संदीप सखाराम नाटक यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने नाटक यांचा सत्कार सरपंच शशिकांत शिंदे, दामोदर शिंदे, जगन्नाथ शेवकर, बाळकृष्ण पानसरे, महेश पानसरे, राहुल ढोरे या मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील चव्हाण, संदीप काशिद, सुरेखा शेवकर, मुकेश शिंदे यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बबनराव ढोरे, आण्णासाहेब शिंदे, प्रशांत ढोरे, मनोहर भेगडे, प्रवीण भापकर, निवृत्ती हिंगे व सर्व ग्रा.पं.सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना संदीप नाटक यांनी संधी दिल्याबद्दल श्रेष्ठी व सर्व ग्रा.पं.सदस्य सदस्यांचे आभार मानले व गावचा विकास हाच मुख्य हेतू साध्य करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेईन.