Pune : महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वयकपदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

पुणे : आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील महायुतीच्या घटक पक्षांच्या भाजप समन्वयकपदी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते खर्डेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पुणे शहर प्रभारी अमर साबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट),शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून,सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केला.


