सातारा – घराच्या जागेवरून सुरू असलेल्या वादातून जावयाने सासऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास करंजे पेठेमध्ये घडली. जावई मनोज दोडमणी याने त्याच्या अन्य एका साथीदारासह सासरे विलास महादु बनसोडे (वय 58, रा. कुपर कॉलनी, सदर बझार सातारा) यांच्या डोक्यात, पाठीवर, हातावर, पायावर दांडक्याने व लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्यांची हत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी करंजे पेठेमध्ये धाव घेतली. खून केल्यानंतर जावई मनोज दोडमनी व त्याचा साथीदार हा घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. घराच्या जागेवरून हा खून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस उपाधीक्षक (गृह) राजेंद्र साळुंखे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करत आहेत.