भोर -1978 मध्ये संपतराव माझ्यासोबतच आमदार झाले. त्यांनी सदैव मला साथ दिली. प्रसिद्धीपासून दूर राहून साथ आणि शक्ती देणारे असे जे सहकारी माझ्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले. त्यामध्ये संपतरावांचे स्थान अग्रभागी राहिल. सत्ता असो वा नसो त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत मला साथ दिली, अशा सहवेदना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
भोरचे माजी आमदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पवार यांनी आंबवडे येथे त्यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी शोकसभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, त्यांनी सरकारकडे जे काही मागितले ते मतदार, जनतेसाठी मागितले. स्वतःसाठी फक्त पंढरपूर मंदिराच्या कमिटीवर नेमण्याची इच्छा व्यक्त केली. तिथे पांडुरंग आणि वारकऱ्यांची सेवा घडावी, ही त्यांची इच्छा होती. गावकऱ्यांना एवढेच सांगणे आहे की, संपतरावाच्या कुटुंबाची त्यांनी काळजी घ्यावी. काहीही अडचणी आल्यास मला कळवावे, मी त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असेन.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जेधे यांचे पुत्र, सरपंच रोहिदास जेधे, रामदास जेधे, पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे, भोर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा बॅंकेचे संचालक भालचंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रकांत बाठे, माजी उपसभापती मानसिंगराव धुमाळ, रवींद्र बांदल, सभापती श्रीधर किंद्रे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, भोर शहराध्यक्ष नितीन धारणे उपस्थित होते.
लोकसभेची आठवण
खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी मी संपतरावांना फोन करून मदतीची विनंती केली होती. तेव्हा “साहेब ती तुमची मुलगी आहे. तशीच माझीही मुलगीच आहे, फोन कशाला केला, असे आधाराचे शब्द देणारे संपतराव आज आपल्यात नाहीत याची आठवण करून देताना शरद पवार भावनिक झाले होते.