राजगुरुनगर : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून माजी नगरसेविका तसेच आरोग्य समितीच्या अध्यक्षा संपदा अमोल सांडभोर यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांच्या कामावर समाधानी असलेल्या मतदारांमुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे. नगरसेविका असताना संपदा सांडभोर यांनी प्रभागातील रस्ते, पाणी, सांडपाणी, स्ट्रीट लाईट यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच “गार्बेज टू गार्डन” ही संकल्पना राबवत शहरात प्रभावी कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी केली होती. आरोग्य समितीच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असताना राजगुरुनगर शहराला राज्य शासनाकडून मिळालेले एक कोटी रुपयांचे बक्षीस हे त्यांच्या पुढाकाराचे मोठे यश मानले जाते. विकासकामांचा भक्कम पाया चास कमान धरणातून शहरासाठी पाणी योजना मंजूर भुयारी गटार योजनेचा पाठपुरावा पूर्ण कचरा उचलण्यासाठी १६ वाहनांची उपलब्धता शहरासाठी अग्निशमन गाडीची सोय यांसारखी महत्वाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. नव्याने प्रभागात जोडलेल्या परिसरातील जीवनावश्यक सेवा सुधारण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार देखील नागरिकांच्या लक्षात राहणार आहे. कोरोना काळातील महत्वपूर्ण योगदान दिले आहे. प्रशासकीय काळात आलेल्या कोरोना संकटात संपदा सांडभोर यांनी अत्यावश्यक सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कसोशीने काम केले. मोफत औषधांचे वितरण, गरजूंना किराणा किट,आरोग्य जनजागृती,पाणी, कचरा व्यवस्थापन व आवश्यक सोयी सातत्याने उपलब्ध दिल्या. या काळात नागरिकांना दिलासा देणारी मदत त्यांनी सातत्याने केली होती. महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम प्रभागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांनी अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.यापुढेही नगर परिषदेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, प्रभागातील शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आगामी काळात प्रभागात विकासासाठी कटिबद्ध राहिला असे संपदा सांडभोर यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांमध्ये संपदा सांडभोर यांच्या कामाचा अनुभव, प्रशासनातली जाण आणि पुन्हा विकासकामांच्या आश्वासनांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या उमेदवारीनंतर प्रभागात मोठी चळवळ आणि चर्चा रंगू लागली आहे. नगरसेवक पद महत्वाचा दुवा “नगरसेविका पद हे प्रशासन व नागरिक यातील महत्वाचा दुवा आहे. नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडवण्याचा मला अनुभव आहे. प्रभागातील मतदार माझ्यावर दाखवलेला विश्वास कायम ठेवतील याची मला खात्री आहे. केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने निधी मिळवण्यात अडचण येणार नाही. नव्या उमेदीने विकास कामांना गती देणार आहे.” संपदा अमोल सांडभोर, माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार