“Same to same…’ : महेश मांजरेकर यांच्या छगन भुजबळ लूकची चर्चा; नेटकरी म्हणाले…

मुंबई – जगभरात चर्चेत असणार, प्रत्येक पर्वामधून प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारा, करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस’… कलर्स मराठीवर बिग बॉस मराठीच्या दोन्ही पर्वांना अभूतपूर्व यश मिळाले आणि जेव्हा कार्यक्रमाचा नवा टिझर वाहिनीवर दिसला तेव्हापासून या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या.

मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से वा बिग बॉस मराठीचे घर असो. महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन, कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची दोस्ती – यारी, नॉमिनेशन प्रक्रिया, कॅप्टनसी, टास्क या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकतात.

नुकतंच शनिवारी आणि रविवारी या आठवड्यातील घरातील सदस्यांची चावडी भरवण्यात आली. यावेळी महेश मांजरेकर कार्यक्रमाचे सूत्रसंचान करताना दिसून आले. ‘बिग बॉस मराठी 3’ च्या पहिल्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली.

दरम्यान, यंदा ‘बिग बॉस’ पेक्षा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांच्या नवीन लूकची मोठी चर्चा रंगली आहे. खरंतरं, त्यांच्या हा लूक पाहून नेटकऱ्यांनी त्यांना सेम टू सेम “छगन भूजबळ’ अशी कमेंट दिलीय. मांजरेकर यांची तुलना नेटकऱ्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी केलीय.

सोशल मीडियावर बॉग बॉसचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी मांजरेकरांना कमेंट दिली. एक नेटकरी म्हणाला… “मला वाटलं भुजबळचं आहेत की काय’ तर, दुसरा दुसरा नेटकरी म्हणाला..  “मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय?’ अश्या अनेक कमेंट महेश मांजरेकर यांच्या लूकसाठी आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.