‘मी छत्रपतींचा वंशज,मला कोणी शिकवण्याची गरज नाही’

Updated On:

नाशिक – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा संदर्भात मराठा समाजाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती हे पुन्हा आक्रमक झालेले आहेत.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण  रद्द केल्यामुळे संभाजीराजे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यातच  संभाजीराजे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली.

संभाजीराजे  म्हणाले’ मराठा आरक्षणा संदर्भात  राज्यात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून जबाबदारी पासून पळ काढत आहे. मात्र  आमच्या मराठा समाजाला याचे काहीच घेणे देणे नाही. माझ्या भूमिकेवरही बोट ठेवत जात  आहे.  मी छत्रपतींचा वंशज,मला कोणी शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

ते पुढे म्हणाले,’माझ्याकडे अनुभव असला तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असलेले अनेकजण आहेत. त्यांच्याशी चर्चा करुन मी 27 तारखेला माझी भूमिका मांडेन. एकदा मी पाय पुढे टाकला की मागे घेणार नाही.

मी येत्या २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशीही चर्चा करणार आहे. या सगळ्यानंतर मी माझी भूमिका मांडेन तेव्हा मराठा आमदार आणि खासदारांनी माझं-तुझं केलं तर बघा, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

संभाजीराजे यांचे फेसबुक लाईव्ह 

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्दबादल ठरवले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ प्रतिक्रिया देतेवेळी संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती.

केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे यांनी सुचविले होते.

आणखी संबंधित बातम्या

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

2026-09-22 19:42:33

Manoj Jarange : "आंदोलनाला सहकार्य न करण्याचे शिंदेंचे मंत्र्यांना आदेश"; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

2026-09-17 10:19:08

Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

2026-09-16 18:04:18

Radhakrishna Vikhe Patil : मुंबईतील नियोजित आंदोलन मागे घ्या; विखे- पाटील यांचे जरांगेंना आवाहन

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

2026-09-16 17:42:26

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल; 'या' संस्थेने परवानगी न देण्याची केली मागणी

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?

2026-09-14 01:15:51

Khopoli News: मनोज जरांगे पाटलांचा 18 सप्‍टेंबरला खोपोलीत मुक्काम! आंदोलकांसाठी काय आहेत खास सोयी-सुविधा?