संभाजी भिडे म्हणजे भगवा दहशतवाद – राहुल डंबाळे

पिंपरी – भीमा कोरेगाव दंगलीनंतर 2 जानेवारी 2018 रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात कलम 307 व इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आजपर्यंत संभाजी भिडे व त्यांच्या इतर साथीदारांना अटक झाली नाही. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे म्हणजे भगवा दहशतवाद आहे. तसेच, याप्रकरणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले इतर गुन्हे मागे घेण्याबाबत शासन निर्णयानुसार त्वरित कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र पक्षनेता राहुल डंबाळे यांनी केली.

दंगलीतील आरोपी असणाऱ्या भिडे यांना अटक करावी या मागणीसाठी ऍट्रॉसिटी जनजागरण परिषदेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी (दि. 14) सत्याग्रह आंदोलन राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केले.

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टीचे (अ) शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, सुवर्णा डंबाळे, कष्टकरी कामगार पंचायतीचे बाबा कांबळे तसेच रवी सावळे, प्रमोद क्षीरसागर, सचिन वाघमारे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.