Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूचा ओटीभरणा सोहळा; पारंपरिक विधींची सोशल मीडियावर चर्चा
Samantha Ruth Prabhu : विधी, मंत्र आणि मंत्रोच्चार करण्याच्या क्रियेला अत्यंत आध्यात्मिक महत्त्व

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. नुकतेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तिची पारंपरिक ओटभरणी पार पडली. या खास क्षणाचे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यासोबतच समांथाने भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओटभरणीच्या फोटोंमध्ये समांथाचा पारंपरिक अंदाज पाहायला मिळत आहे. साडी, केसांमध्ये माळलेला गजरा आणि साधा लूक यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये समांथा ध्यानधारणेत मग्न झालेली दिसते, तर काही फोटोंमध्ये ती विधींमध्ये सहभागी होताना पाहायला मिळते. तिच्या पारंपरिक लूकसोबतच या अनोख्या आणि आध्यात्मिक ओटभरणीचीही सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
विधीदरम्यान समांथाला हळदही लावण्यात आली. तिचा पती राज निदिमोरूही या खास सोहळ्यात तिच्यासोबत उपस्थित होता. समांथाने शेअर केलेल्या या खास क्षणांवर चाहत्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
रूथ प्रभूनं सांगितलं की, जरी तिला प्रत्येक विधीमागील अर्थ माहीत नसला तरीही तिनं नेहमीच भारतीय परंपरांचा आदर केला आहे. प्राचीन विधी, मंत्र आणि मंत्रोच्चार करण्याच्या क्रियेला अत्यंत आध्यात्मिक महत्त्व आहे, असं तिचं मानणं आहे.
हा सुंदर आणि आध्यात्मिक सोहळा आयोजित केल्याबद्दल समांथाने तिची मैत्रीण शिल्पा रेड्डीचे विशेष आभार मानले. हा संपूर्ण सोहळा अनुभवल्यानंतर मनात आशीर्वाद आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचं तिने सांगितलं. आयुष्यातील या महत्त्वाच्या क्षणी असा वेगळा अनुभव घेण्याची संधी दिल्याबद्दल समांथाने शिल्पाचे आभार व्यक्त केले.
हेही वाचा :
Shivsena Hearing: शिवसेना कुणाची? पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी





