भोंग्याच्या वादात समाजवादी पक्षाची उडी; योगींची डोकेदुखी वाढणार

Updated On:

नवी दिल्ली – धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या मुद्यावरून राजकारण सुरू असताना समाजवादी पार्टीच्या उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्याने लाऊडस्पीकरवरून महागाईची माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतांच्या माध्यमातून वाढत्या महागाईची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचा उद्योग वाराणसीतील समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रविकांत विश्‍वकर्मा यांनी सुरू केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यांच्या या उपक्रमाला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही पाठिंबा दिला असल्याचे समजते आहे.
लाऊडस्पीकरचा उपयोग सामाजिक मुद्यांच्या माहितीसाठी केला जाणार आहे. महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी याच्याविरोधात लाऊडस्पीकरवरून आवाज उठवला जाणार आहे, असे अखिलेश यादव यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

रविकांत विश्‍वकर्मा यांनी आपल्या या उपक्रमाचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या देशासमोर महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य हे महत्वाचे मुद्दे आहेत. मात्र मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकच्या मुद्यातून या महत्वाच्या मुद्यांवलून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठीच आपण आपल्या गच्चीवर लाऊडस्पीकर लावले असल्याचे त्यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

2026-10-07 08:39:47

दिव्यांगांचे अनुदान सहा हजार करा; महागाईच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांची मागणी

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?

2026-10-05 21:38:34

RBI Repo Rate : महागाईचा भडका, रुपया कमजोर; आरबीआय व्याजदर वाढवणार?

Pulse Prices : दिवाळीआधी तूरडाळ महागणार? जागतिक बाजारात दर 10 टक्क्यांनी वाढले; सरकारची हालचाल सुरू

2026-10-03 19:14:41

Pulse Prices : दिवाळीआधी तूरडाळ महागणार? जागतिक बाजारात दर 10 टक्क्यांनी वाढले; सरकारची हालचाल सुरू

RBI Repo Rate : आरबीआयकडून व्याजदर वाढीचे संकेत; गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागण्याची शक्यता

2026-09-29 15:57:00

RBI Repo Rate : आरबीआयकडून व्याजदर वाढीचे संकेत; गृहकर्ज आणि वाहनकर्ज महागण्याची शक्यता

लक्षवेधी : व्याजदरवाढीच्या पर्वात...

2026-09-19 05:30:47

लक्षवेधी : व्याजदरवाढीच्या पर्वात...