Samadhan Sarvankar defeated। मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 मधील मतमोजणीतुन महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे निशिकांत शिंदे हे या प्रभागातून विजयी झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर पराभूत यांचा पराभव केला आहे. समाधान सरवणकर यांचा निशिकांत शिंदे यांनी 582 मतांच्या फरकाने आघाडीवर घेत निकाल आपल्या बाजूने वळवत यश मिळवले आहे. या निकालामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे समाधान सरवणकर यांचा पराभव निश्चित झाला आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीसोबत चित्र स्पष्ट होत असून या प्रभागात ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळत असल्याचे सध्याचे कल दर्शवत आहेत. अटीतटीची लढत आणि सत्तापालट Samadhan Sarvankar defeated। दरम्यान, प्रभाग १९४ हा शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला मानला जात होता. समाधान सरवणकर यांना पराभूत करणे हे निशिकांत शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच शिंदे यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. शेवटच्या फेरीपर्यंत ही चुरस कायम होती, मात्र अखेर मतदारांनी निशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांना विजयाची माळ घातली. “ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये झाला त्याचा अस्त देखील प्रभादेवीत व्हायला हवा. मतदारांचा मी ऋणी आहे. सरवणकर कुटुंबांने बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला. त्यांना गाडण्याचे काम सर्व मतदारांनी केले. त्यांनी आमच्यावर आरोप केले पण आमच्याकडे सत्ता नव्हती. गेली वर्षभर मी प्रश्न सोडवत आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक आमदार महेश सावंत यांनी दिली.